बीड । ऑनलाईन रिपोर्टर
मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी विनायक मेटेंनी उभारलेला लढा, उसतोड कामगारांचा संघर्ष आणि आरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरुढ पुतळ्याची उभारणी यासाठी जो लढा मेटेंनी उभा केला तो लढा आपण सर्वांनी पुढे न्यावा अस म्हणत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी शुन्यातून विष्व निर्माण करणे कशाला म्हणतात ते मेटेंच्या संघर्षाकडे पाहितल तर दिसून येत.
पुढे बालतांना माजी मंत्री धनंज मुंडे म्हणाले माझं अन् मेटेंचं आगळ वेगह नातं होत. आठ वर्षे आम्ही दोघांनी विधान परिषदेमध्ये काम केले. राजेगाव ते राजधानी हा प्रवास पाहितल्यानंतर शुन्यातून विष्व निर्माण करणारी म्हण का पडली असले हे त्यांच्या कार्यातून दिसून येते. मराठा समाजाचे आरक्षण आसो, उतोड कामगारांचे प्रश्न आसोत, छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक असो याबात मेटेंनी उभारलेला जो लढा आहे, जी लढाई आहे ती आपण सर्वांनी पुढे न्यावी असं म्हणत धनंजय मुंडे यांनी विनयक मेटेे यांना श्रधांजली वाहिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री विखे पाटील, तान्हाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. श्रीकांत शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आ. भीमराव केराम, आ. संदीप क्षीरसागर, भारती लव्हेकर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. अभिमन्यू पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, पाशा पटेल, नमिता मुंदडा, आ. श्वेता महाले, आ. सुमन आर. पाटील, आ. धनंजय मुंडे, खा. प्रतिम मुंडे, पंकजाताई मुंडेे, खा. जलील, आ. रत्नाकर गुट्टे, आ. बाळासाहेब आजबे, संजय दौड, अशोक पाटील, सुनिल धांडे, सुरेश नवले, राजेंद्र जगताप, जनार्धन तुपे, मात्री मंत्री खोतकर, सिराज देशमुख, माजी मंत्री, जयदत्त क्षीरसागर, पापा मोदी, आ. प्रकाश सोळंके, बदामराव पंडीत, औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक ठाकूर, उपविभागीय अधिकारी नामेदव टिळेकर, तहसीलदार सुहास हजारे, अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर, कृषी अधिकारी साळवे, प्रा. मोराळे, अशोक हिंगे, अनिल जगताप, केशव आंधळे, कुडलकी खांडे, मुळकू, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, फुलचंद कराड, टी. पी मुंडे, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, पप्पू कागदे, आदी मान्यवर उपस्थित होते.