बीड (रिपोर्टर) घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले 1 लाख 60 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बीड शहरातील जय गुरुदेव रेसीडेन्सी फुलाईनगर, बीड येथे 15 ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी बीड शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश चंद्रकांत आनेराव यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 15 ऑगस्टच्या रात्री ते घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले रोख 1 लाख 60 हजार रुपये लंपास केले. 16 ऑगस्ट रोजी ते घरी आले असता आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ढाकणे हे करत आहेत.