प्रत्येक तालुक्यात घेणार बैठका
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील हे दोन दिवस बीड जिल्हा दौर्यावर आहेत. ते आज बुधवार आणि गुरूवार दोन दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका घेणार असून तालुकानिहाय बैठकीला शिवसेनेसह महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.
संपर्कप्रमुख धोंडू पाटील हे बीड जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौर्यावर आहेत. बुधवारी आणि गुरूवारी ते बीड जिल्ह्यात शिवसेनेच्या तालुकानिहाय बैठका घेणार आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजता आष्टी, दुपारी एक वाजता पाटोदा, दुपारी तीन वाजता शिरूर, सायंकाळी पाच वाजता गेवराई तर गुरूवारी सकाळी अकरा वाजता बीड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुकानिहाय बैठकीला शिवसेना महिला आघाडी, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.