वादविवाद होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालय परिसरात आरसीपी तैनात; दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता
बीड (रिपोर्टर) बीड तालुक्यातील पोखरी येथील एका 25 वर्षीय विवाहित महिलेने काल दुपारी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री उशीरा महिलेचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. महिलेने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. सासरच्या आणि माहेरच्या लोकात वाद होऊनये यासाठी जिल्हा रुग्णालय परिसरात सकाळपासून आरसीपी तैनात करण्यात आली होती. घटनास्थळी डीवायएसपी वाळके, पिंपळनेर ठाण्याचे आघाव यांनी भेट दिली होती.
प्रियंका बाबूराव थिटे (वय 25, रा. पोखरी) या महिलेने काल दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती होती. सदरील घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना झाल्यानंतर ठाणेप्रमुख आघाव, उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही लोकांच्या मदतीने रात्री उशीरा महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे. महिलेचे माहेर जालना जिल्ह्यातील असून तिचे नातेवाईक आज सकाळी रुग्णालयात दाखल झाले होते. महिलेच्या आत्महत्येचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. आत्महत्यावरून महिलेचे सासरचे आणि माहेरच्यात वादविवाद हो नयेत म्हणून सकाळपासूनच रुग्णालय परिसरात आरसीपी तैनात करण्यात आली होती. घटनास्थळी डीवायएसपी वाळके हेही दाखल झाले होते.