बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये डुकरं आणि हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे प्राणी शेतकर्यांच्या पिकांची प्रचंड नासधूस करू लागली. बाजरी, मका, शेवगा यासह भाजीपाल्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. दरम्यान शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.
राज्य सरकारने शेतकर्यांना आपल्या शेतीला कंपाऊन्ड करण्यासाठी अनुदान देण्याची गरज आहे. डुकरांसह हरणांनी धुमाकूळ घातल्याने शेती पिकांचे नुकसान होऊ लागले. बीड तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.