बीड (रिपोर्टर)ः- गुजरात दंगलीतील बिलकीस बानो प्रकरणामधील नराधम आरोपींची गुजरात सरकारने शिक्षा रद्द करुन त्यांना सोडून देण्यात आले आहे. याचा सर्वस्तरातून जाहीर निषेध करण्यात येत आहे. बलात्कार्यांना पुन्हा जेलमध्ये टाकून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलंाचा भव्य निषेध मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता किल्ला मैदान या ठिकाणाहून निघणार आहे. मोर्चात जिल्हाभरातील महिलंानी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
गुजरातच्या सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी बिलकीस बानो प्रकरणातील बलात्कार्यांना सोडून दिले. या प्रकाराने सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. बलात्कार्यांना सोडणं म्हणजे कायद्याला मुरड घालणे असं आहे. या बलात्कार्यांना पुन्हा शिक्षा देण्यात यावी आणि त्यांची रवानगी जेल मध्ये करावी यासह पैंगबर यांच्या बद्दल अवमानकारक टिप्पनी करणार्यांवर कडक कायदा लागू करण्यात यावा यामागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा भव्य निषेध मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता किल्ला मैदान या ठिकाणाहून काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारो महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.