परस्थिती आटोक्यात परंतु काळजी आवश्यक
तालुका पशुवैदयकिय आधिकारी प्रभारी
तीन दवाखाने देखील वाऱ्यावर
भैय्यासाहेब तांगडे l वडवणी
जिल्ह्यासह परजिल्ह्यात जनावरांमध्ये लंम्पी या संसर्ग आजाराने डोके वर काढले आहे.यात वडवणी तालुक्यात दोन ठिकाणी पशु रुग्ण आढळले असून परस्थिती आटोक्यात आहे.परंतु काळजी व उपचार घेणे काळाची गरज असुन वडवणी तालुक्याचे पशुवैदयकिय अधिकारी पद प्रभारी असून सदरील आधिकारी हे माजलगांव येथून कारभार हाकत आहेत.तर तीन दवाखान्यात आजपासून प्रभारी राज कारभार होणार आहे.अशी माहिती तालुका पशुवैदयकिय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि,वडवणी शहरातील गाय व साळींबा येथील एका गोऱ्याला लंम्पी या संसर्ग आजाराची लागण दि.८ संप्टेबर २०२२ रोजी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पशु विभागाच्या सूचनेनुसार त्यांचा उपचार देखील केला असून ते बरे देखील आहेत.अशी माहिती आज तालुका पशुवैदयकिय कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.तर यामध्ये बैल,गाय,रेडे,म्हशी,मेंढ्या आणि शेळ्या आशा एकुण ३२ हजार पशुची नोंद आहे.तर लंम्पी या संसर्ग आजार पशुमध्ये वाढू नये म्हणून शासन आणि विशेष पशु विभाग कामाला लागले आहे.आजारी असणाऱ्या पशुची विशेष दखल घेऊन योग्य तो उपचार देत असल्याच पशु विभाग सांगत असून तालुक्यातील प्रत्येक गांवा-गांवात जाऊन पशुची विचारणा करुन आजारी पशुची देखभाल घ्यावी अशी पशु मालकांमध्ये जनजागृती केली जात आहे.आज स्थानिक प्रशासनासह बीड येथील आधिकारी व कर्मचारी तालुक्यातील परस्थित जाणून घेत असून याबाबत आज सायंकाळी चार वाजता पशुवैदयकिय दवाखाना येथे तालुक्यातील लंम्पी या आजारावर बैठक घेण्यात येणार आहे.अशी माहिती देण्यात आली असून लंम्पी या संसर्ग आजाराचे दोन पशु आढळले असले तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही परंतु पशुची विशेष काळजी घेऊन योग्य ते उपचार घेणे देखील काळाची गरज
असल्याच मत आज आज सायं.दै.रिपोर्टर यांच्याशी बोलताना तालुका पशुवैदयकिय कार्यालयाने व्यक्त केलं आहे.
प्रशासन लोकांचा अभाव *
लंम्पी हा संसर्ग आजाराने शिरकाव केला असून वडवणी येथील तालुका पशुवैदयकिय अधिकारी हे पद प्रभारी आहे.पदाचे आधिकारी यांची महिन्यापुर्वीच बदली झाली आहे.त्यांचा माजलगांव येथील लांडे मँडम यांच्याकडे अतिरिक्त कारभार दिला आहे.तर याठिकाणी अँडशनल पशुवैदयकिय आधिकारी,पर्यवेक्षक,ड्रेसर,परिचर दोन असे एकूण पाच कर्मचारी कार्यरत आहेत.तर या अंतर्गत सहा दवाखाने असुन वडवणी,चिंचवण,आणि देवळा येथे कर्मचारी आहेत.तर चिखलबीड,देवडी आणि कुप्पा याठिकाणी आधिकरी व कर्मचारी पद नसून आज याठिकाणी प्रभारी देण्यात आले आहेत.अशी माहिती देण्यात आली आहे.