कुक्कडगाव (रिपोर्टर) तालुक्यातील कुक्कडगाव येथे अज्ञात चोरट्याने रात्री जनरल स्टोअर्सचे दुकान फोडून रोख अडिच हजारासह दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.
महादेव डिगांबर राऊत यांचे कुक्कडगाव येथे जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. रात्री अज्ञात चोरट्याने दुकान फोडून गल्यातील अडीच हजारासह वीस हजाराच मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सकाळी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोर्या, घरफोड्यामुळे नागरिक दहशतीखाली आले असून गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.