नेकनूर (रिपोर्टर) शेतातून घरी येत असताना एका 20 वर्षीय विवाहीत महिलेवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना धावज्याचीवाडी येथे घडली.
20 वर्षीय महिला शेतातून घरी येत असताना आरोपी सोमनाथ सुधाकर काटे, रा.धावज्याचीवाडी याने सदरील महिलेचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी प्रथमदर्शनी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती पिडीतेने कोर्टात दिल्यानंतर नेकनूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास नेकनूर पोलिस करत आहेत.