विद्यार्थी व पालकांसह आमरण उपोषणाचा इशारा
दिंद्रुड (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील चाटगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये रिक्त असलेली 4 शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी असे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांनी दिले.
धारूर तालुक्यातील चाट गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 205 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु या जिल्हा परिषद शाळेमध्ये चारच शिक्षक कार्यरत असून यामुळे त्या शिक्षकावर अतिरिक्त भार पडत असून विद्यार्थ्यांना हवी तशी गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे चाटगाव जिल्हा परिषद शाळेतील 3 शिक्षकांचे इतरत्र केलेले समायोजन तात्काळ रद्द करावे व आंतरजिल्हा बदली मध्ये 1 शिक्षकाची बदली झाली आहे त्यामुळे रिक्त चाटगाव जि प शाळेत रिक्त असलेली चार पदे 10 आक्टोंबर पर्यंत भरण्यात यावीत अन्यथा 11 आक्टोंबर पासून विद्यार्थी व पालक यांच्यासह आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांनी दिला आहे.