बीड (रिपोर्टर) माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थक शेख इरशादभाई (बिल्डर) यांचे वडील शेख अब्दुल रज्जाक अब्दुल अन्सार (रा. बालेपीर) यांचे सोमवारी रात्री आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. आज सकाळी 10 वाजता बालेपीर दर्गा कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. दिवंगत शेख अब्दुल रज्जाक हे राज्य परिवहन महामंडळात अनेक वर्षे चालक म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. सामाजिक व धार्मिक कार्यात ते सदैव अग्रेसर असत. त्यांच्या पश्चात सहा मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेख कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.