बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातल्या सर्वसामान्णयांसह कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांना मदत होईल, अशा पद्धतीने भविष्याचा विचार करत स्व. काकुंनी बीड जिल्ह्यात अनेक प्रकल्प राबवले. समाजाच्या प्रगतीसाठी निरंतर झटणार्या काकुंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांचा वारसदार म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने विकासाची मुहूर्तमेढ कायम तेवत ठेवेल, असा विश्वास देतो, म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज काकुंच्या समाधीस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले.
पुढे ते म्हणाले, शेतकरी वर्गाला, बेरोजगार युवकांना जिल्ह्यातुन बाहेर जाण्याची भविष्यात गरज पडु नये म्हणून जिल्हाच्या महिला खासदार असताना स्व.काकूंनी अनेक प्रकल्प राबवले होते. स्वतः उभे राहून गजानन साखर कारखान्याची वीट ना वीट रचली होती, आपला शेतकरी बांधव बागायदार व्हावा हे स्वप्न उराशी बाळगून ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन दिले. तोच कारखाना मागील काही दिवस बंद पडला होता. स्व.काकूंच्या प्रेरणादायी विचारांनी आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचीपुर्ती करत गजानन साखर कारखाना याच वर्षी सुरु करत आहोत.
लोकनेत्या व समाजाच्या प्रगतीसाठी निरंतर झटणार्या खासदार स्व.केशरकाकु क्षीरसागर माझ्या आजी यांनी अनेक वर्षाआधीच एक आद्यायावत हॉस्पिटलची गरज ओळखली होती. रुग्णांना मोठ्या शहराकडे जाण्यासाठी गैरसोय होतं होती.मी लहान असताना अनेकदा आजींच्या चर्चा मध्ये चांगल्या हॉस्पिटलची गरज ऐकलेले, त्यामाध्यमातून रुग्णांची सेवा व्हावी आणि ग्रामीण व शहराच्या नागरिकांना रुग्णालयाचा लाभ व्हावा.स्व.काकूंची प्रेरणादायी इच्छा काकु नाना मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण झाली याचा मनस्वी आंनद देखील होत आहे. स्व.काकूंनी पाहितलेल्या स्वप्नांचा मी वारसदार म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने विकासाची मुहूर्तमेढ कायम तेवतं ठेवेल असा विश्वास देतो, हेच काकुंना अभिवादन!