बीड (रिपोर्टर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी अध्यक्ष अमित ठाकरे 11 व 12 आक्टोबर रोजी बीड जिल्हा दौर्यावर येत आहेत. ते बीड जिल्ह्यातील विद्यार्थी,कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांसह विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी अध्यक्ष अमित राज ठाकरे हे बीड जिल्हा दौर्यावर येत आहेत. उद्या आणि परवा ते बीड जिल्ह्यातील विद्यार्थी कार्यकर्त्यांसाठी आपला वेळ देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांसह विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दि.11 ऑक्टोबर मंगळवार रोजी सायं.6 वाजता परळी येथे आगमन होणार आहे. प्रभु वैद्यनाथाचे दर्शन मनसे जनसंपर्क कार्यालय परळी येथे भेट आणि त्यानंतर बीडकडे रवाना होणार आहेत. बीड येथे मुक्काम, 12 ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी 9 वाजता कनकालेश्वर मंदिर येथे दर्शन, दुपारी 1 ते 2 शासकीय विश्रामगृह बीड येथे विद्यार्थ्यांच्या भेटी, विद्यार्थीसेना पुर्नबांधणी बैठक व मनसेच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता कार्यकर्त्यांच्या घरी चहापाणी, सायं.5 वाजता श्रीक्षेत्र नारायणगड येथे दर्शन, सायं.6 वाजता भगवानगडाचे दर्शन आणि त्यानंतर जालन्याकडे रवाना होणार आहे. अशी माहिती मनविसेचे जिल्हाध्यक्ष अॅड.शैलेश जाधव यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पक्षात काम करण्यासाठी इच्छूक असणार्या तरूण तरूणींनी दि.12 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.