बीड (रिपोर्टर) गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यासह राज्यभरात जनांवरांना लंपी आजाराने घेरले. आतापर्यंत राज्यात दहा हजार जनावरे लंपीने मरण पावल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली. जनांवर दगावल्यानंतर मदत घोषीत करण्यात आली पण फक्त दोन हजार जनांवराच्या मालकांना मदत देण्यात आली इतर 8 हजार जनांवरांची मदत अद्यापही शेतकर्यांना मिळालेली नाही. ही मदत नेमकी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन महिन्यापासून राज्यभरात लंपीच्या आजाराची सुरूवात झाली. सदरील हा आजार प्रामुख्याने गाय आणि बैलांना होत असल्याचे समोर आले. अनेक जनांवरांना या आजाराची लागण झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा यासह इतर ठिकाणच्या जनांवरांना हा आजार झाल्याचे समोर आले. अजुनही या आजाराची तिव्रता कमी झालेली नाही. लंपीने जनावर दगावल्यानंतर त्याची नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. आतापर्यंत दहा हजार जनावरं दगावली असल्याची नोंद पशु वैद्यकीय विभागाकडे करण्यात आली आहे. जनावर दगावल्यानंतर संबधीत शेतकर्यांस दुधाळ गायीसाठी 30 हजार, भाकड गाय आणि बैलासाठी 25 हजार आणि वासरू 16 हजार रुपये अशा प्रकारची मदत जाहीर करण्यात आली आहे. दहा हजार मयत जनांवरापैकी फक्त दोन हजार जनांवराची मदत शेतकर्यांना मिळालेली आहे. इतर शेतकर्यांना अद्यापही मदत मिळाली नसून ही मदत नेमकी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.