बीड (रिपोर्टर) बहिणीसोबत किरायाच्या घरात राहणार्या एका 22 वर्षीय तरूणाने अज्ञात कारणावरून रात्री गळफास घेतल्याची घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेची माहिती सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ बाबासाहेब तांदळे (वय 22) हा गेल्या काही दिवसापासून त्याच्या बहिणीसह किरायाच्या घरात बीडमध्ये राहत होता. तो एका खासगी दवाखान्यात कामाला असल्याचे समजते. त्याची बहिण आणि घरचे गावाला गेले होते. तो रात्री घरी एकटा असताना अज्ञात कारणावरून रात्री गळफास घेतला असावा असे पोलिसांनी सांगितले. सकाळी याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला.