गेवराई शहरातील चार चाकी
गाड्या चोरीचे सत्र सुरूच
——————————
नाईक नगर येथून स्वीप्ट कारची चोरी ; पोलीस प्रशासन वसुलीतच दंग
——————————
गेवराई (रिपोर्टर) गेवराई शहरातील गाड्या चोरीचे सत्र काही केल्या कमी होत नसून शहरातील नाईक नगर येथून चोरट्यांनी एक स्विप्ट गाडी लंपास केल्याचे घटना मध्यरात्री घडली असून पोलीस मात्र दिवाळी टार्गेटच्या वसुलीतच दंग असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरासह परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडी, गाड्या चोऱ्यांच्या प्रमाण वाढ होत आहे. दरम्यान काल दि. 3 नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी पुन्हा शहरातील नाईक नगर येथून कृषी मंडळाधिकारी एल.जी.चव्हाण यांची घरासमोर उभी असलेली MH -23 AS- 1157 क्रमांक असलेली नवी स्विप्ट गाडी लंपास केली आहे. गेल्या वर्षभरात 7 ते 8 चारचाकी गाड्या चोरीच्या घटना घडल्या आसताना अनेक गाड्यांचा अद्यापही शोध लगला नसून पोलिसांना याचे काहीएक देणंघेणं नसल्याचे दिसून येत आहे. चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून तपास मात्र शून्य असल्याचे दिसून येत आहे. तर एकीकडे चोरीच्या घटनेत वाढ होत असताना पोलीस प्रशासन हे वाळू वाहतूक व अवैध धंद्याच्या वसुलीत दंग असल्याचे दिसून येत आहेत. तर गेवराई पोलीस ठाण्याअंतर्गत वाढत असलेले चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिकांत व वाहन धारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ठाणे प्रमुख पेरगुलवार यांच्या कार्यप्रणालीवर नागरिक प्रचंड नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
———
*पोलीस निरीक्षक साहेब घटना घडली की कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगता, मग वसुलीला चार कर्मचारी कसे..?*
————-
गेवराई पोलीस ठाणे अंतर्गत चोरी, खून, दरोडा आशा अनेक घटना सतत घडत असताना गेवराई पोलीस ठाणे प्रमुखाची कुठलीच ठोस कारवाई नसल्याने चोरट्यांना अभय मिळत आहे. एकीकडे अनेक गुन्हे घडत असताना पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी हे वेगवेगळ्या बिटमधून फक्त आणि फक्त वसुलीचे काम करून ठाणे प्रमुखासह स्वतः च्या तुंबड्या भरताना दिसून येत आहेत. दुरीकडे कुठलीही घटना घडली की, ठाण्यात कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत वरिष्ठांसमोर वेळ मारून नेता मग वसुलीसाठी वेगवेगळ्या बिटला चार-चार कर्मचारी कसे..? असा सवाल उपस्थित होत आसून याबाबत एसपी साहेबांनी लक्ष घालून गेवराई पोलिसांना जाब विचारण्याची गरज आहे.