बीड (रिपोर्टर) मुलीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटप करून गावाकडे निघालेल्या 52 वर्षीय पित्याच्या गाडीला अपघात झाल्याने यामध्ये सदरील इसम उपचारादरम्यान मरण पावल्याची घटना रात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेने परळी शहरातील गणेश पार्क भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुभाष वसंतराव दिक्षीत (वय 52, रा.गणेश पार्कजवळ, कंडक्टर कॉलनी परळी) यांच्या मुलीचे पुढील महिन्यामध्ये लग्न आहे. लग्नाच्या पत्रिका घेवून दिक्षीत बीड येथे आले होते. पत्रिका वाटप करून ते मोटारसायकलवर परळीकडे निघाले होते. रात्रीच्या दरम्यान कुप्पा फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. ट्रॉलीला त्यांची गाडी धडकली. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.