बीड (रिपोर्टर) विद्युत पंपासाठी विजेचे कोटेशन भरण्यात आले. कोटेशन भरल्यानंतर विजेची जोडणी विज वितरण कंपनीने करायला हवी पण अद्यापही केली नाही. विजेची जोडणी न करताच विज वितरण कंपनीने एका शेतकर्याला 1 हजार 870 रुपयांचे बील दिले आहे. दरम्यान हे बील कुठल्या आधारावर देण्यात आले, याचा जाब विज वितरण कंपनीकडे विचारला आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
अभिजीत बन्सीधरराव कदम यांनी विद्युत पंपासाठी कंपनीकडे रितसर कोटेशन भरले. कोटेशन भरल्यानंतर विजेची जोडणी करून देणे गरजेचे होते. मात्र जोडणी न करताच कदम यांना विज वितरण कंपनीने 1870 रुपयांचे बील दिले. हे बील कुठल्या आधारावर देण्यात आले याची विचारणा कदम यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे. हे बील रद्द करण्यात यावे अशी मागणी अभिजीत कदम यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. कदम यांनी माळीवेस भागातील विद्युत पंपासाठी विजेचे कोटेशन भरलेले होते.