बीड (रिपोर्टर) अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत कामगारांना घरे दिले जातात. दरवर्षी काही प्रस्तावच मंजूर केले जातात. बीड जिल्ह्यामध्ये 2427 प्रस्ताव पेंडिंग आहेत. फक्त 12 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. इतर प्रस्तावांना कधी मंजुरी मिळणार आणि कामगारांना कधी हक्काचा निवारा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नोंदणीकृत कामगारांना शासन अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करत आहे. घरकुल वाटप करत असताना वेगवेगळे निकष लावून जाणीवपुर्वक कामगारांचे घरकुल प्रस्ताव पेंडिंग ठेवण्याचे काम प्रशासकीय पातळीवर केले जात आहेत. दरवर्षी प्रस्तावांना मंजूरी तात्काळ दिल्यास कामगारांना हक्काचा निवारा मिळू शकतो. बीड जिल्ह्यातील 2427 घरकुलांचे उद्दिष्ट असताना फक्त 12 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून इतर प्रस्तावांना कधी मंजुरी मिळणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.