बीड (रिपोर्टर) तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रासाठी बीएसएस मोटार या कंपनीची इलेक्ट्रीक बाईक आणि स्कुटरची डिलरशीप देतो तसेच तुम्हाला पाच इलेक्ट्रीक मोटारसायकल पाठवून देतो, असे सांगून एका भामट्याने तब्बल पावणे चार लाखांना गंडवल्याची घटना घडली असून या प्रकरणी काल बीड ग्रामीण ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महादेव सुभाषराव कुडके (वय 38 वर्षे, व्यवसाय शेती, रा. अव्वलपूर ता. जि. बीड) या शेतकर्याला ब्रिश्वदीप सरकार (रा. कोलकाता राज्य पश्चिम बंगल) याने फोन करून तुम्हाला बीएसएस मोटार या कंपनीची इलेक्ट्रीक बाईक आणि स्कुटरची संपुर्ण महाराष्ट्रात डिलरशीप देतो, तसेच तुम्हाला पाच इलेक्ट्रीक मोटारसायकल लागलीच पाठवून देतो, असे म्हणून पैशाची मागणी केली. त्यावेळी महादेव कुडके यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून फोन पे वरून पैसे पाठवले. दि. 28 नोव्हेंबर 2021 पासून ते दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांना तब्बल 3 लाख 70 हजार रुपये पाठवूनही डिलरशीप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महादेव कुडके यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत ब्रिश्वदीप सरकार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिफ्टचा मोह, लाखाला लागला चुना
बीड (रिपोर्टर) तुम्हाला माय ग्लॅम अॅपमधून गिफ्ट लागले आहे. त्यासाठी जीएसटी भरावी लागेल, असे म्हणून एकाला 1 लाख 17 हजार 863 रुपयांना गंडवल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भक्ती कन्स्ट्रक्शन येथे राहणार्या एकाला माय ग्लॅम अॅपमधून बोलतोय, असे म्हणून फोन आलता, तुम्हाला गिफ्ट लागले आहे असे समोरच्याने सांगताच गिफ्टचा मोह धरून त्याने भामट्याला जीएसटी पोटी 1 लाख 17 हजार 863 हजार रुपये पाठवले. मात्र कसलेही गिफ्ट न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली.