आष्टी ( रिपोर्टर ) मागिल 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लगला आहे.मागिल वर्षी यंदाही परतीच्या पावसाने खरीप हंगामातील हातची पिके भुईसपाट होऊन अतोनात नुकसान झाले त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी शेतकर्यांना आर्थिक अचडणीचा सामना करावा लागत आहे. अति पाऊस झाल्याने राहिलेले रब्बीचे पिके चांगली आली आहेत. यातून आर्थिक घडी बसण्याची शेतकर्यांना आशा होती. मात्र गेल्या 5 दिवसांपासून महावितरणने टाकळी अमिया सबटेशन वीज पुरवठा खंडित केला असून शेतकर्यांपुढे नवे संकट उभे राहिले असून पाणी असूनही अनेक शेतकर्यांना आपल्या पिकाला पाणी देत येत नाही.सोमवारी सकाळी 11 च्या दरम्यान शेतकर्यांनी टाकळी अमिया सबटेशन मध्ये घुसून आक्रमक पवित्रा घेत जाब विचारत अधिका-यांना धारेवर धरले शेतकर्यांचा संताप पाहून महावितरण अधिका-यांनी ताबडतोब विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला आहे.
तालुक्यातील टाकळीअमिया ,सराटेवडगांव, निमगांव चोभा ,रूई नालकोल, नांदा, गेल्या पाच दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा बंद केला गहु,ज्वारी,हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी जेरीस आला आहे. त्यातच महावितरणे विद्युत पुरवठा बंद केल्याने परिसरातील संप्तत शेतक-यांनी चक्क टाकळी अमिया येथील सबस्टेशन सोमवारी सकाळी अधिकार्यांना घेराव घालत महावितरणच्या अभियंत्याना धारेवर धरून निषेध व्यक्त केला. यावेळी सरपंच सावता ससाणे,ज्ञानेश्वर चौधरी, प्रा.राम बोडखे, डॉ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी , मधुकर गिर्हे, अशोक चौधरी, अशोक एकशिंगे, श्रीरंग चौधरी , तात्यासाहेब नालकोल, आजिनाथ नालकोल, पांडुरंग धोंडे किरण चौधरी दिलीप बापू, शेंडे भाऊ चौधरी, यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.टाकळी अमिया, रूईनालकोल, सराटेवडगांव, चोभानिमगांव, नांदा या गावातील शेतकरी उपस्थित होते.