उपोषणकर्त्यांची बजरंग सोनवणेंनी घेतली भेट
केज (रिपोर्टर) केज तालुक्यातील भाटुंबा येथील ग्रामपंचायतचे प्रभाग रचनेसह विविध भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलनकर्त्यांची बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चौरे आणि भाटुंबा येथील सरपंच सुनील धपाटे यांच्या नेतृत्वाखाली भाटुंबा गावातील सुमारे 20 ते 35 नागरीक मागील चार दिवसांपासून चुकीची वार्ड रचना केली आहे, पाच
वर्षांपुर्वी मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या कामाचे वेतन अदा झाले नाही त्याची चौकशी करावी, ग्रामपंचायतचे संगणक चोरून नेले, राष्ट्रीय पेयजल योजनेत केलेला भ्रष्टाचार, अंगणवाडी बांधकामाचे खोटे दस्तावेज देऊन पैसे उचलले, ऑरो फिल्टर न बसविता कागदोपत्री दाखवून पैसे उचलले यासह इतर कामाच्या चौकशीसाठी गावकर्यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज पाचवा दिवस असून उपोषणकर्त्यांची बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली.