जालना/फुलसांगवी (रिपोर्टर)- मराठवाडा ही भूमी संतांची भूमी आहे. ही भूमी शौर्याची आहे, अन्यायाला चिरडून टाकणारी हीच भूमी आहे. शब्दांना दार देणारी हीच भूमी आहे. हा देश महाराष्ट्राच्या शिकवणीवर चालतो. जेव्हा जेव्हा संकटे आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली मात्र आता याच महाराष्ट्रातील दैवतांचे अपमान केले जात आहेत. ते आम्ही सहन करणार नाहीत, जाब विचारणारच, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केेंद्र सरकारसह महाराष्ट्रातल्या खोके सरकारवर हल्ला चढवला. उद्या पंतप्रधान या ठिकाणी येतील महापुरुषांचा अपमान करणार्यांवर पांघरुण घालतील, परंतु माझी त्यांना विनंती आहे. अशा लोकांना पाठिशी घालू नका, आणि कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकाकडून होणार्या कारवाईवर काहीतरी बोला, देशासाठी ठरलेले धोरण फसले म्हणून इंग्लंडच्या पंतप्रधानांनी 45 दिवसात राजीनामा दिला. आमच्याकडे फसलेली नोटबंदी पाहून देखील पदावर असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
ते घनसांगवी येथे आयोजीत 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये बोलत होते. व्यासपीठावर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये होत नाही. आता आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठ्न जाणार आहे. ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालणार. अशी लोकशाही आपण मानणार नाही. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ असा लावणार असेल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. तुम्ही कोणालाही मतदान केले तर त्याला आम्ही खोक्यात बसून आमच्याकडे घेऊन टाकू अशी परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांवर देखील उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. उच्च शिक्षण मंत्री शिक्षण देता कशासाठी भीक मागायला. शिक्षण देण्यासाठी जर भीक मागायची असेल तर शिकल्यावर देखील भीक मागायची तुमची इच्छा आहे का? असा टोला ठाकरेंनी लगावला. तर तुम्ही कोण आम्हाला भीक माघ सांगणारे. संत एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम हे कोणत्या शाळेत शिकले होते असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पाटलांचा समाचार घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी येथे बोलायला नाही तर ऐकायला आलो आहे. साहित्यिकांनी न भिता चुकांवर बोट ठेवत खडसविण्याचे काम करायला पाहिजे. आज बोलणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. लोकशाहीत मतांची किंमत खोक्यासारखी होत आहे. तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आहे? हे तुम्हालाही माहित नाही. मतदान सुरतमार्गेे गुजरातला जात आहे. हिम्मत असेल तर या देशातली लोकशाही संपल्याचे जाहीर करा, असे आवाहन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिले. देशामध्ये केंद्र सरकारकडून होत असलेल्या दबावतंत्रावरही त्यांनी टीका केली. ही भूमी संतांची भूमी आहे, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वरांपासून अनेक साहित्यिकांची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. तेव्हा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवून घेतले. आताचे रेडे हे खोके बोलत आहेत. सुदैवाने मराठवाड्यातील साहित्यिकांचे लिखान परखड आहे. खरंतर आता खुर्चीवर बसणार्या लोकांना जाब विचारायला हवा आणि तो तुम्ही विचारलाच पाहिजे. पंतप्रधान उद्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. या मार्गाचे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे आहे. मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांवर अपशब्द काढणारे आजही उजळ माथ्याने हिंडत आहेत. उद्या पंतप्रधान त्यांना पांघरुण घालतील. शिवराय किती महान होते, बाळासाहेब कसे होते, यावर बोलतील. परंतु जे चुकले त्यांचे काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राला डिवचतात. त्यावर पंतप्रधान बोलणार काय? असे एक ना अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केले. राजा चुकला की, राज्याचे नुकसान होते. यथा राजा तथा प्रजा असते. असेही ठाकरे या वेळी म्हणाले.