बीड (रिपोर्टर)ः- भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने याचा सर्वस्तरातून निषेध होवू लागला. आज डिपीआयच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौकात तिव्र निदर्शने करण्यात आली. वराहाच्या गळ्यामध्ये चंद्रकांत पाटलाचा फोटो अडकून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनकर्त्यांनी पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देत राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी अनेक कार्यकर्र्त्यांची उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसापासून भाजपाचे वाचाळ लोक वेगवेगळी वक्तव्य करतात. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याच्या सर्वस्तरातून जाहीर निषेध होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. बीड येथे आज सकाळी डिपीआयच्यावतीने साठे चौकात तिव्र निदर्शने करण्यात आली. वरहाच्या गळ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा फोटो अडकून निषेध करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. हे आंदोलन अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी सुभाष लोणके, उत्तम पवार, भारत कानडे, केशव लोंडे, बाळासाहेब पौळ, अमोल सुतार, योगेश लोंडे, सतिष चांदणे, आनंद चांदणे, विजय चांदणे, अविनाश पाटोळे, अशोक पाटोळे, योगेश वाघमारे, अभिमान पाटोळे, नितीन पाटोळे, प्रविण चांदणे, बाळासाहेब दोडके, संतोष ससाणे, नामदेव भिषे, रतन कांबळे, रवि कांबळे सह आदिंची उपस्थिती होती.