माजलगाव (रिपोर्टर) शहरातील शाहूनगर भागात ज्ञानदिप किराणा दुकानात रविवारच्या मध्यरात्री उशिरा लॉक तोडून चोरी करण्यात आली. यावेळी अज्ञात चोरट्यांनी नगदी कॅश व माल 63 हजाराचा मुद्देमाल चोरीला नेला आहे.
शाहूनगर भागात मालपाणी यांचे ज्ञानदीप किराणा दुकान आहे. सोमवार दि.19 रोजी मालपाणी हे सकाळ दुकान उघडण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुकानात केलेल्या पाहणी दरम्यान फेविकिकचे बॉक्स किंमत 18 हजार रुपये,फेवी टाईपचे बॉक्स किंमत 12 हजार 600 रुपये, झोरीक 7 हजार 500 रुपये,ब्रिस्टॉल बॉक्स 12 हजार रुपये,गल्ल्यातील नगदी 2 हजार रुपये व इतर किराणा माल असा एकूण 63 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान द्वारकादास जगन्नाथ मालपाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.