बीड (रिपोर्टर) धनगर आरक्षण्याच्या प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज नेते भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान धनगर समाजाला विरोध करणार्या खा. गावीत यांचा तीव्र निषेध करत धनगर समाज संतप्त पाहायला मिळला संसदे मध्ये चालू असणार्या अधिवेशनात खा. सुप्रिया ताई सुळे यांनी धनगर आरक्षण प्रश्नावर आपल्या तीव्र शब्दात धनगर आरक्षणाचे काय झाले असे प्रश्न विचारले असता त्यांच्या प्रश्नाला विरोध करत खा. गावीत यांनी धनगर आरक्षण नको असा विरोध केला आसे माध्यमातून कळाल्या नंतर महाराष्ट्रातील धनगर समाज गाविताचां. तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या डढ प्रवर्गाच्या सवलतीपासून हा दर्या खोरयातला वंचित, पिढीत, शोषित या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम हे सरकार करीत आहे. आमची सत्ता आली की पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण लागू करू असे तत्कालीन मुख्यमंत्री तथा आताच्या सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन बारामती येथे झालेल्या विराट आंदोलनात शब्द दिला होता की सत्ता आम्हाला द्या आरक्षण आम्ही देऊ परंतू आज अनेक कॅबिनेट बैठकी झाल्या टिस या संशोधन संस्थेच्या नावाखाली धनगरांची फसवणूक करण्यात आली आजवर आरक्षण प्रश्न मार्गी लागला नाही धनगर आरक्षण मिळेपर्यंत भाजप सरकारने आदिवासी ज्या योजना आहेत त्याच योजना धनगर समाजाला लागू करण्यात आल्या आहेत परंतु समाजाला आजपर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा या आमच्या समाजाचा विश्वासघात शिंदे फडणवीस सरकार करत आहे. आता तरी तात्काळ धनगर आरक्षणाची आमलबजावणी करण्यात यावी व आरक्षण मिळेपर्यंत ज्या 22 योजना लागू करण्यात आलेल्या आहेत त्या योजनांना तात्काळ 5000 कोटी रुपये भरीव तरतुद करुन या चालू अधिवेशनात तात्काळ आमलबजावणी करण्यात यावी याद राखा धनगरांना विरोध करणार्यांना येणार्या काळात महाराष्ट्रातील धनगर समाज जश्यास तसे उत्तर देऊन त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असे मत आंदोलन दरम्यान यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी व्यक्त केले..याप्रसंगी गणेश सातपुते,कैलास निर्मळ, रामनाथ यमगर,उमेश निर्मळ,साईनाथ कैतके व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.