नेकनूर (रिपोर्टर) नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगव्हाण येथील एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना काल घडली. या प्रकरणी पिडितेने नेकनूर पोलीस ठाण्यात रात्री तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन आरोपीला पोलिसांनी अटक केली.
चाळीस वर्षीय महिलेवर विकास श्रीरंग खंदारे याने काल ज्वारीच्या शेतात नेऊन तिच्यावर जबरी बलात्कार केला. पिडित महिलेने रात्री उशिरा नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी खंदारे याच्याविरोधात कलम 376, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटना कोणास सांगू नको नसता जिवे मारीन अशी धमकीसुद्धा आरोपीने पिडितेला दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथकप्रमुख मिसळे हे करत आहेत.