पाच हजारापेक्षा जास्त तरुणांनी केला संकल्प
बीड (रिपोर्टर)ः- समाजामध्ये व्यसनाधिनता वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. तरुणाई व्यसनापासून अलीप्त राहीली पाहिजे असा संकल्प पुढे आणत नव वर्षाच्या पुर्व संध्येला बीड तालुक्यातील शंभर गावामधील पाच हजारापेक्षा जास्त तरुणांनी व्यसन मुक्तीचा संकल्प केला आहे. हा आगळा वेगळा उपक्रम अंबेसावळीचे उपसरंपच धनंजय गुंदेकर यांनी राबवला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये व्यसनाचे प्रमाण वाढू लागले. व्यवसनामुळे अविष्याचं वाटोळं होतं. कुटूंबामध्ये कलह निर्माण होतात. गावातील वातारण खरा होतो. तरुणांनी व्यसन करु नये असा संकल्प घेवून अंबेसावळीचे उपसरंपच धनंजय गुंदेकर हे पुढे आले आहे. आज 31 डिसेंबर या दिवशी बीड तालुक्यातील शंभर गावामध्ये तरुणांना निरव्यसनी राहण्याची शपथ घेतली. पाच हजारापेक्षा जास्त तरुणांनी यामध्ये सहभाग घेवून व्यसन न करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.