मुंबई (रिपोर्टर) महाविकास आघाडीतील दोन नेत्यांकडून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य करण्यात आले आहे. अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राज्यात सत्तांतर होणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली तर सामनातून राज्यातील बेकायदा सरकार लवकरच पडणार असल्याचे म्हटले आहे. अमोल मिटकरी यांनी दावा केलाय की, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राज्यात सत्तांतर होणार आहे. पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात मग्रुर सरकार आहे. त्यांना महापुरुषांच्या अस्मितेशी काही देणेघेणे नाही. राज्यापालांना पाठीशी घातले आहे.