बीड (रिपोर्टर) फोनवर नेहमी नेहमी कोणाला बोलतात, असं पत्नीने पतीला विचारताच पतीने पत्नीस बेदमपणे मारहाण केल्याची घटना बार्शी नाका परिसरात घडली. या प्रकरणी पतीविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शीतल अमोल आचार्य (वय 30) या महिलेने आपला पती अमोल आचार्य यास फोनवर नेहमी नेहमी कोणास बोलत असतात, असा जाब विचारल्यानंतर पतीने पत्नीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सासुनेही शिवीगाळ केली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.