बीड (रिपोर्टर) गेवराई येथील एका शेतकर्याने शेतातील वीज कापल्याच्या कारणावरून विष प्राशन केलं आहे. फेसबुक लाईव्ह करत त्याने विष प्राशन केलं असून त्यानंतर सदर शेतकर्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या या शेतकर्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महावितरणने शेतातील वीज कापल्यामुळे या त्रस्त शेतकर्याने फेसबुक लाईव्ह करत शेतात असलेल्या डीपीच्या शेजारीच विष प्राशन केलं. तर हे लाईव्ह पाहून गावातील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत शेतकर्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तर महावितरणच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.