बीड (रिपोर्टर) ग्रामपंचायत निवडणुकीची कुरापत काढून लिंबागणेश येथील भाजपाच्या एका कार्यकर्त्यास अज्ञात लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदरील तरुणास उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीनंतरही अनेक गावांमध्ये वादावादी सुरुच आहे. लिंबागणेश येथील भाजप कार्यकर्ते शंकर वाणी यांना पाटोद्याजवळ अज्ञात लोकांनी हॉकी स्टीक, बेल्ट व लोखंडी गजाने बेदमपणे मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. या तरुणास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.