आतापर्यंत 25 टक्के उमेदवारांनीच दाखल केला खर्च
बीड (रिपोर्टर) निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांना खर्च सादर करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले होते. हा खर्च ऑनलाईन स्वीकारण्यात येत होता. मात्र ऑनलाईनमध्ये अनेक अडीअडचणी निर्माण होत असल्याने ऑफलाईन खर्च स्वीकारा, अशी मागणी होत होती. आज निवडणूक विभागाशी चर्चा झाल्यानंतर निवडणूक विभागाने ऑफलाईन खर्च स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. ऑनलाईन फक्त 25 टक्केच उमेदवारांचा खर्च जमा झाला. बीड जिल्ह्यात 5 हजारांपेक्षा जास्त उमेदवरा निवडणूक रिंगणात उभे होते.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होऊन 20 डिसेंबरला निकाल घोषीत झाला. निकाल लागल्यानंतर सर्व उमेदवारांना आपआपला खर्च दाखल करण्याचे निर्देश निवडणूक विभागाने दिले होते. हा खर्च ऑनलाईनदाखल करायचा होता. मात्र ऑनलाईनमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. कधी सर्व्हर डाऊन होत होता तर कधी इतर अडचणी येत असल्याने ऑफलाईन खर्च स्वीकारा, अशी मागणी केली जात होती. आज बीडच्या निवडणूक विभागाने राज्य निवडणूक विभागाशी चर्चा केली. त्यानुसार राज्य निवडणूक विभागाने उमेदवारांचा खर्च ऑफलाईन स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत 25 टक्केच उमेदवारांनी ऑनलाईन खर्च सादर केला आहे. बीड जिल्ह्यातल्या 704 ग्रामपंचायतींसाठी जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. गत निवडणुकीत उमेदवारांनी खर्च सादर न केल्यामुळे या निवडणुकीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. आगामी काळात आपल्याला निवडणुकीसाठी अडचण येऊ नये म्हणून सर्वच उमेदवारांनी खर्च दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ऑफलाईन खर्च जमा करण्याचे आदेश आल्यानंतर उमेदवारांना खर्च दाखल करण्यास आता अडचण निर्माण होणार नाहीत.