बीड (रिपोर्टर) कौटुंबिक कलह पोलीस ठाणे , न्यायालयापर्यंत जाऊ नये, तत्पुर्वी समुपदेशन करत तडजोडी झाल्या तर चांगलच आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये महिला व मुलांसाठी सहायक कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षांतर्गत वर्षभरात 180 तक्रारी दाखल झाल्या होत्या. समुपदेशन केल्यामुळे 63 जणांचे संसार जुळले असून 69 प्रकरणे 498 साठी वर्ग करण्यात आले. 33 प्रकरणे फाईलीवर ठेवण्यात आले आहेत.
पती-पत्नीच्या भांडणामुळे संसारात व्यत्यय येतो. ही भांडणे पोलीस ठाणे, न्यायालयापर्यंत जातात. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर नात्यात अधिकच वितुष्ट येतं. गुन्हे दाखल होण्यापुर्वी संबंधितांमध्ये तडजोडी व्हाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये महिला व मुलींसाठी सहायक कक्ष स्थापन करण्यात आले. यामध्ये 2022 मध्ये 180 तक्रारी आल्या होत्या. समुपदेशन केल्यामुळे 63 प्रकरणात तडजोडी झाल्या. 69 प्रकरणे 498 साठी वर्ग करण्यात आले व 33 प्रकरणे फाईलीवर ठेवण्यात आले. समुपदेशन करण्याचे काम गोकुळ धस, कमल वाघमारे हे करत आहेत.