पुणे (रिपोर्टर) पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं यामध्ये त्यांना कोणताही इजा झाली नाही. खासदार सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली. सुदैवाने यामध्ये त्यांना कुठलीही इजा झालेली नाही.
हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र आहे. त्या क्लासचे आज उद्घटन होतं. याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बोलवलं होतं. यावेळी दीप प्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीला आग लागली. त्यावेळी उपस्थित असणार्या एका व्यक्तीनं साडीला आग लागल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी तात्काळ साडीला लागलेली आग विजवण्यात आली. नशीब बलवत्तर होतं म्हणून मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणताही इजा झालेली नाही. त्या सुखरुप आहेत.