ड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत परिसरात महापुरुषांचे स्मारक उभारावे, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे मात्र अद्यापपर्यंत येथे स्मारक उभारले नसल्याने आज शंभुप्रेमींनी मावळ्यांच्या वेशभुषेत आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. हे आंदोलन डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महापुरुषांचे व लोकनेत्यांचे पुतळे उभारण्याचा ठराव आणि फाईलिंगचा फार्स जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. मात्र प्रत्यक्षात पुतळे उभारण्याचे काम होत नसल्याने शंभुप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज सकाळी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. या वेळी शेख युनुस, बलभीम उबाळे, मुबीन शेख, शेख मुश्ताक, राहुल कवठेकर, मसु शेळके, आपचे अशोक येडे, अक्रम शेख, सय्यद सादेक, संजय खाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.