बीड (रिपोर्टर) जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची 70 कामे सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांना पात्रतेनुसार देण्यात आलेले आहेत. मात्र या बेरोजगार अभियंत्यांनी आपले टेंडर पास होऊनही संबंधित निविदेची अनामत रक्कम आणि सीडीआर न भरल्याच्या कारणावरून आज मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या सुनावण्या घेत तात्काळ प्रक्रिया पुर्ण करा, नसता नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशारा या सुनावणीत अभियंत्यांना दिला आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खुल्या निविदा प्रक्रियेनुसार काही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना राखीव ठेवण्यात आले होते. यामध्ये या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी कामाचे टेंडर भरले. ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याचे टेंडर शासन नियमाप्रमाणे कमी किमतीचे आले अशा बेरोजगार अभियंत्यांची निविदा मंजूर करण्यात आली मात्र निविदा मंजूर करूनही या कामाची अनामत रक्कम आणि सीडीआर भरला नाही त्यामुळे ही निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आलेली नाही. निविदा अंतिम करण्यासाठी आणि पाणीपुरवठ्याचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी जवळपास 70 सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या सुनावण्या आज मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी घेतल्या. या सुनावणीमध्ये एका एका अभियंत्याला दोन-दोन-तीन-तीन कामे त्यांच्या पात्रतेनुसार मिळालेले आहेत. मात्र काही कामांची अनामत रक्कम आणि सीडीआर भरलेला आहे तर काही कामांचा सीडीआर भरलेला नाही. त्यामुळे या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी तात्काळ अनामत रक्कम व सीडीआर भरावे नसता त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे पवार यांनी या बैठकीत सीईओंनी बेरोजगार अभियंत्यांना सुनावल्याचे कळते.