बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून सदरील कामगारांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावे, या मागणीसाठी आज असंघटीत मजदूर पंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, मजूर उपस्थित होते.
खर्या कामगार नोंदणीसाठी नोंदीत कंत्राटदार, मिस्त्री, ग्रामसेवक, नगर परिषद मुख्याधिकारी यांनी 90 दिवस काम करणार्यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर व आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतरही खोटी कारणे देऊन नोंदणी नाकारणे जाणे हे तात्काळ थांबवावे, कामगारांची नोंदणी करून घ्यावी यासह इतर मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी राजकुमार घायाळ, शेरजमा खान पठाण, शहादेव शेळके, श्रीमती गणोरकर, नाईकवाडे, ढोले, डोईफोडे, सुनिल क्षीरसागर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.