बीड (रिपोर्टर) प्राथमिक आरोग्य केंद्रातंतर्गत उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आपल्याला मुळ वेतनानुसार कायमस्वरुपी शासन सेवेत सामावून घ्यावे, या व इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्र आणि उपकेेंद्रामध्ये बीएएमएस आणि बीएस्सी नर्सिंग झालेले हे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करतात. त्यांना आरोग्य प्रशासनाने कंत्राटी आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त्या दिलेल्या आहेत. तर राज्यात काही ठिकाणी 40 हजार या मूळ वेतनावर त्यांना सेवेत सामावून घेतले आहे. त्यामुळे याप्रमाणेच बीड जिल्ह्यातही राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या समुदाय आरोग्य अधिकार्यांना सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच समुदाय आरोग्य अधिकार्यांनी आज एक दिवसाचे ठिय्या आंदोलन जिल्हा परिषदेसमोर केलेले आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले आहेत.