मुंबई (रिपोर्ट) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी परळीमध्ये अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी ब्रिचकँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 16 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांची रुग्णालयातील सुट्टी झाली. सक्तीची विश्रांती आणि प्रवास टाळण्याबाबत डॉक्टरांनी सूचना केलेल्या आहेत. आज सकाळी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी गेले. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. या वेळी फडणवीस यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करत प्रकृतीची काळजी घ्या, असेही धनंजय मुंडेंना म्हटले.