माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव तालुक्याच्या अनेक गावात रविवारी भरदिवसा तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी भुरट्या चोर्या झाल्याचा प्रकार घडला आहे.या चोर्या मोटार सायकलवरून आलेल्या चोरट्यांनी केला आहे.यावेळी चोरट्यांनी घटनास्थळी हाताला सापडेल ती वस्तू उचलून पोबारा केला.
माजलगाव तालुक्यातील सादोळा, सांडसचिंचोली,आबेगाव या गावात भुरट्या चोर्या रविवारी झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पाच-सहा गावातही भुरट्या चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धुमाकूळ घातल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान यावेळी मोटार सायकलचा वापर करत चोरट्यांनी गावात प्रवेश करून सादोळा गावातील एकाच्या घरातून 10 हजार रुपयांचे सोने लंपास केले. तर आंबेगाव येथील एका कुटुंबाच्या घरातून कपाटातील 10 हजार रुपये लंपास केले.तर आजूबाजूच्या आनेक गावातही या भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालत हाताला येईल ती वस्तू लांबवली. दरम्यान घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.बालम कोळी,सपोनि विजय झोनवाल यांच्यासह पोलिस टीमने भेट दिली आहे.यावेळी चोरट्यांकडून घटनास्थळी संसार उपयोगी सामानाची नासधूस करण्यात आली होती.दरम्यान घटनास्थळाची पाहणी करत तात्काळ पोलिसांकडून चोरट्यांना ट्रेस केल्या जात आहे.सदरील भुरट्या चोर्याच्या मालिकेमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. दुपारपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही.