बीड (रिपोर्टर) जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जालना जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री असल्याने ते प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण जालना येथे करणार असल्यामुळे बीड येथील शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. तर गावपातळीवरील ध्वजारोहण सरपंचाच्या हस्ते होणार आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता चालू असल्याने ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होईल याबाबत शंका होती. मात्र याबाबत प्रशासनाने स्पष्ट करत आचारसंहिता असल्याने शासकीय ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते तर गावपातळीवरील ध्वजारोहण सरपंचांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जालना आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे सावे हे पालकमंत्री या नात्याने जालना या ठिकाणी 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण जालना येथे करणार आहत. त्यामुळे मुख्य शासकीय ध्वजारोहण जे की पोलीस मुख्यालय या ठिकाणी होते ते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील झेंडा वंदन हे राधाबिनोद शमा यांच्याच हस्ते होणार आहे.