बीड (रिपोर्टर) अंमळनेर येथील सिद्धीविनायक गणेश मंदिरात असलेली दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना 29 जानेवारी रोजी घडली असून या प्रकरणी काल अंमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमळनेर येथे सिद्धीविनायक गणेश मंदिर आहे. येथे मोठ्या प्रमाणात भावीक-भक्त येतात. मंदिरामध्ये दानपेटी ठेवलेली आहे. 29 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडत त्यातील रोख रक्कम लंपास केली. ही बाब काल सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर मंदिराचे पुजारी मुकुंद छगन राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.