बीड (रिपोर्टर) प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जात नाही याला कारण प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असून याच्या निषेधार्थ आज विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन केले. या आंदोलनात अनेकांचा सहभाग होता.
जलजीवन प्रकरणामध्ये अजूनही ठोस कारवाई करण्यात आली नाही, त्याचबरोबर इतरही शासकीय कामकाज पारदर्शकपणे होत नाहीत. प्रशासकीय अधिकारी नुसतेच कागदी घोडे नाचवण्याचे काम करत आहेत. अधिकार्यांना जागे करण्यासाठी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी आज जल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन केले. या वेळी डॉ. गणेश ढवळेंसह आदींचा सहभाग होता. वनविभाग, भुयारी गटार योजना, जलजीवन, आरोग्य विभाग या सर्वांची चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना सादर केले.