बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौसाळा शाखेतील खातेदारांच्या खात्यातून अनाधिकृतरित्या रक्कम गायब होत असून खातेदारच धमकावले जाते. गैरव्यवहार करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेतील मयत शेतकर्यांच्या खात्यावरील रक्कम बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने परस्पर गायब करत आहेत. खातेधारकांना पोलिसात तक्रार करून धमकावले जाते. या दडपशाहीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, तरी देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज त्यांनी चौसाळा शाखेसमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी विजय झोडगे, डिगांबर झोडगे, भास्कर झोडगे, भास्कर झोडगे, नवनाथ चोथवे, संतोष साबळे, अशोक कुडके, संभाजी कुडके, सखुबाई झोडगे, शांताबाई झोडगे, जयश्री झोडगे यांच्यासह आदी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. क