अन्य चार घटनात चौघा जणांचा मृत्यू
बीड (रिपोर्टर) खेळत असताना गेट अंगावर पडल्याने एका पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री शहरातील जुना नगर नाका या ठिकाणी घडली. अन्य चार जणांचा विविध घटनेमध्ये मृत्यू झाला. चोवीस तासात पाच जण दगावले असून या सर्वांचे शवविच्छेदन बीड जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले.
पेठ बीड भागातील मोतीलाल आब्बड यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दुसरी घटना बेदरवाडी शिवारात घडली. पंकज ढेरे हे डोहाच्या पाण्यात बुडून मरण पावले. तिसरी घटना आंधळ्याची वाडी येथे घडली. रेखा आंधळे (वय 26) या महिलेने विषारी औषध प्राशन केले होते. तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहरातील पात्रूड गल्ली येथील धनराज विठ्ठल गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाचवी घटना आदर्शनगर जुना नगरनाका येथे घडली. पाच वर्षीय नमन वैभव चिरके या मुलाच्या अंगावर गेट पडल्याने यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 24 तसामध्ये पाच जण दगावले. या सर्वांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले. मेडिकल ऑफीसर राम आवाड, पोलीस कर्मचारी सावंत, माने यांच्या उपस्थितीत नरेश पिवळ यांनी शवविच्छेदन केले.