22 लाख क्विंटल साखरेचे निघाले उत्पादन
साखरेचा उतारा निघाला कमी
बीड (रिपोर्टर) गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील ऊसउत्पादक शेतकर्यांचा ऊस मे-जूनपर्यंत गेला होता. ऊस घेऊन जा म्हणून शेतकर्यांना कारखान-दारांची विनवणी करावी लागत असे, यंदा मात्र लवकरच संपुर्ण उसाचे गाळप पुर्ण होणार. आतापर्यंत 29 लाख 76 हजार 19 मे.टन उसाचे गाळप झाले. या उसापासून 22 लाख 49 हजार 75 क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले. इतर जिल्ह्याच्या मानाने बीड जिल्ह्यात साखरेचा उतारा कमी निघाला.
यंदाचा हंगाम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झाला. गेल्या वर्षीय उसाचं उत्पादन जास्तीचा होता त्यामुळे मे-जूनपर्यंत उसाची तोडणी सुरू होती. यंदा काही कारखाने आणि उसाचे गुर्हाळ सुरू झाल्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्यांची फरफट झाली नाही. मार्च-एप्रिलपर्यंत सर्व उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 29 लाख 76 हजार 19 मे.टन उसाचे गाळप झाले. या उसापासून 22 लाख 59 हजार 75 क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले. साखरेचा उतारा मात्र बीड जिल्ह्यात कमी आला. इतर जिल्ह्यांमध्ये 10 चा उतारा आला असून बीडमध्ये फक्त 7.59 या प्रमाणे उतारा आला आहे. साखरेचा उतार कमी आल्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्यांना उसापासून तितका आर्थिक लाभ झाला नसल्याचे दिसून येते.