नेकनुर, (रिपोर्टर):- कांद्याला कवडीचा भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. नेकनुर हद्दीतील एका 25 वर्षीय शेतकर्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. घटनास्थळी नेकनुर पोलीस दाखल झाले होते.
कांद्याला भाव नसल्याने राज्यातील शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यातही अनेक कांदा उत्पादक शेतकरी आहेत. बोरखेड येथील संभाजी अर्जुन आष्टीकर (वय 25 वर्ष) या शेतकर्याने कांदा लावला होता. कांद्याला भाव मिळत नसल्याने सदरील शेतकर्याने रात्री आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. या शेतकर्याकडे कर्ज असल्याचेही सांगण्यात येते. घटणास्थळी नेकनुर पोलीस दाखल झाले होते.