बीड (रिपोर्टर)ः- पत्नीने फोन करुन आपल्या पतीला माहेरी बोलावले मात्र पती माहेरी येताच माझ्या पोरीला का त्रास देतात असे म्हणत सासर्याने जावायला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बीड शहरातील पेठ बीड भागातील गांधीनगर येथे दि.07 मार्च रोजी घडली. या प्रकरणी काल पेठ बीड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अरशद शेख युनूस रा.नेकनूर यांची पत्नी बीड येथे माहेरी आली होती. 7 मार्च रोजी तिने आपल्या पतीला फोन करुन माहेरी बोलावून घेतले. शेख अरशद शेख युनूस हे बीडमध्ये येताच तुम्ही आमच्या पोरीला निट नांदवत का नाही, तिला त्रास (पान 7 वर…)
का देता असे म्हणून शेख अरशद यांना शिवीगाळ करुन लाथा बुकयांनी व लाटी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी पेठ बीड पोलीसात पत्नी, सासरा, मेव्हुणा, साडु यांच्यावर कलम 324, 323, 504, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.