बीड, (रिपोर्टर):- मोबाईल शॉपीवाल्याला खोटे बोलुन त्याच्याकडून 2 मोबाईल घेऊन पैसे न देता फसवणुक केल्याप्रकरणी बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्सारी मोहमद शाहेद रा. मसरतनगर,जालना रोड बीड यांची सहयोगनगर, डि.पी. रोड येथे ए.एस. नावाची मोबाईल शॉपी आहे. त्यांच्या मोबाईल शॉपीवर 30 जानेवारी 2023 रोजी सिद्धार्थ देवीदास झेडे रा. म्हसोबाचीवाडी ता.इंदापुर जि. पुणे हा मोबाईल घेण्यासाठी मोबाईल शॉपीवर आला. अन्सारी मोहमद शाहेद यांच्या चुलत्याची ओळख सांगुन त्यांच्याकडून दोन लाख 35 हजाराचे दोन महागडे मोबाईल घेतले व माझे ए.टी.एम. कार्ड येणार आहे असे म्हणून मोबाईलचे बील दिले नाही. आपली फसवणुक झाल्याचे अन्सारी मोहमद शाहेद यांच्या लक्षात येताच त्यांनी बीड शहर पोलीसात काल तक्रार दिली.